सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे तोडग्यानुसार प्रती टन ५० रुपये ऊस बिल केले जमा

कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने तोडग्यानुसार अतिरिक्त ऊस बिलापोटी प्रती टनाला ५० रुपयांप्रमाणे फरक बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवार, दि. २२ पासून आपापल्या बँकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी पालकमंत्री हसन मुश्रीफ, शेतकरी संघटना व जिल्हाधिकारी यांच्यामध्ये झालेल्या तोडग्यानुसार ही रक्कम जमा केली असल्याचे कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे. त्या गळीत हंगामाची म्हणजेच सन २०२२-२०२३ या गळीत हंगामाची ‘एफआरपी’ प्रती टनाला रु. २९०४.७९ इतकी असून, कारखान्याने प्रत्यक्षात प्रती टनाला रुपये तीन हजारांप्रमाणे ऊसदर यापूर्वीच अदा केला आहे.

कारखान्याच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे कि, कारखाना प्रशासनाने यावर्षी कामगारांना बोनसपोटी १६.६६ टक्के म्हणजेच दोन पगार अदा करण्याचे ठरविले आहे. कारखान्याने दिवाळीपूर्वी जाहीर केलेल्या वाढीव ऊसदर व बोनसमुळे शेतकऱ्यांसह कामगारांमध्ये आनंद आणि समाधानाचे वातावरण आहे. चालू गळीत हंगाम म्हणजेच सन २०२४ – २०२५ या गळितासाठी शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्व ऊस गाळपसाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन या पत्रकात केले आहे. यापुढेही सरसेनापती साखर कारखाना सर्वाधिक ऊस दर देण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here