लाहौर: पाकिस्तान सरकारने तुरुंगवास भोगणार्या पूर्व पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पंजाब प्रांतातील साखर कारखान्यांविरोधात कारवाई केली आहे आणि 36 एकर जमीनही ताब्यात घेतली आहे. या जमिनीवर गेली 37 वर्षे अतिक्रमण करण्यात आले होते.
पंजाब भ्रष्टाचार निरोधक स्थापना (एसीई) चे प्रमुख गौहर नफीस म्हणाले, एसीई ने लाहोर पासून 200 किलोमीटर दूर असणार्या साहीवाल मध्ये शरीफ परीवाराने 37 वर्षांपूर्वी हडपलेली 36 एकर जमीन परत घेतली आहे. शरीफ (69) 24 डिसेंबर 2018 पासून राहोल च्या कोट लखपत तुरुंगात गेल्या सात वर्षापासून शिक्षा भोगत आहेत. कोर्टाने त्यांना अल अजीजिया कारखान्या संदर्भात त्यांना शिक्षा दिली होती. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबाने कुठलेही चुकीचे काम केले नसल्याचे सांगून, त्यांच्या विरोधात हे राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे.
नफीस म्हणाले की, शरीफ कुटुंबाच्या इत्तेफाक साखर कारखान्याने 1982 मध्ये राज्यातील 36 एकर जमीन हडप केली होती. याबाबतीत खोलवर चाचपणी करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरुन त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करुन कारखान्याच्या मालकांकडून 37 वर्षाचे भाडे वसूल करुन देशाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई होवू शकेल. ते म्हणाले, शरीफ यांच्या कुटुंबाला लवकरच याबाबत एसीई च्या वतीने नोटीस देण्यात येणार आहे आणि राज्यातील जमीनीवर अतिक्रमण करण्याच्या मुद्द्यावर त्यांचा जबाब दाखल केला जाईल. एसीई कडून तीन दशकांपूर्वीच्या गोष्टींबाबतही लखपत तुरुंगात शरीफ यांची चौकशी केली जावू शकते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.