बीड: महाराष्ट्रातील ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी भागवली नाहीत त्यांच्यावर कठोर कार्यवाही होणार आहे. 4 एप्रिल रोजी राज्य साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केन्देकर यांना पत्राद्वारे कळविले आहे कि जे साखर कारखाने शेतकऱ्यांची देणी भागविली नाहीत त्यांच्यावर पूर्वीच्या आदेशांची अंमलबजावणी करून कठोर कार्यवाही करण्यास सांगितले होते.
सदर पत्रामध्ये बीडमधील वैद्यनाथ कोऑपरेटिव्ह शुगर मिल चा देखील सहभाग आहे, ज्याचे व्यवस्थापन पंकजा मुंडे, महिला व बाल कल्याण विभाग मंत्री या पाहत आहेत. सदर साखर कारखान्याकडे तब्बल 22.46 कोटी रुपयेची थकबाकी आहे.
सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे आहे त्यातच महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी हा महत्वाचा भाग आहे आणि कोणत्याही राजकीय पक्षांसाठी एक निर्णायक वोट बँक आहे. देय रकमेमुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी कोणत्याही राजकीय पक्षाला झटका देऊ शकतात.
सदरचा गंभीर विषय हाताळण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वीच ठोस पाऊले उचलली आहेत पण अद्यापही ऊस थकबाकी कमी झाली नाही.
फेब्रुवारीमध्ये सरकारने साखरेची किमान विक्री किंमत 29 रुपयावरून 31 रुपये प्रति किलोपर्यंत वाढविली आहे आणि शेतकर्यांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी साखर कारखान्यांना सरकारने 10000 कोटी रुपयांपेक्षा अधिक सॉफ्ट लोन मंजूर केले होते तरी सुद्दा शेतकऱ्यांची थकबाकी शिल्लकच आहे.
साखरेचा अधिक साठा आणि कमी किमती याचा गंभीर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा हंगाम साधारणतः 15 एप्रिलपर्यंत बंद होईल तोपर्यंत शेतकऱ्यांचे 4,609.55 कोटी रुपये द्यावे लागतील .
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp