मुझफ्फरनगर : जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी जर शेतकऱ्यांच्या ऊस बिलांची थकबाकी त्वरीत न केल्यास कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत १४ दिवसांत बिले अदा केली गेली पाहिजेत असे आदेश जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी यांनी दिले.
कोणता साखर कारखाना, किती शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करणार आहे, याचा आढावा घेण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकवाणी सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी सेल्वा कुमारी यांनी सांगितले की ऊस बिले देण्यातील उशीर कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही.
शेतकऱ्यांना एक आठवड्यात गाळपाला गेलेल्या ऊसाचे पैसे मिळाले पाहिजेत. जे बिले अदा करणार नाहीत, अशा कारखान्यांनी कारवाईस तयार रहावे.
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढाव्यावेळी भैसाना साखर कारखान्याकडे गेल्यावर्षीची ५५.५८ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उघड झाले.
कारखान्याला तत्काळ पैसे देण्याचे निर्देश देण्यात आले. कारखान्याच्या प्रतिनिधींनी ३१ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना सर्व पैसे दिले जातील असे सांगितले.