ओव्हर लोडेड ट्रॅक्टर ट्रॉलींमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे आता नियमबाह्य ओव्हर लोड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
पोलिस अधिक्षकांनी साखर कारखान्यांच्या ऊस केंद्रांची यादी मागवली आहे. ही यादी मिळाल्यानंतर एक बैठक घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर ओव्हर लोडेड ट्रक आणि ट्रॅक्टरवर कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे.
ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतरच जिल्ह्यात वाहतूक अपघातांची संख्या वाढली. ओव्हरलोडेड ट्रक आणि ट्रॅक्टरमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर आरटीओ आणि पोलिस काही दिवसांसाठी जागृती अभियान चालवतात. पण, कारवाईच्या नावावर केवळ दंड वसूल केला जातो आणि परिस्थिती तशीच राहते. जिल्ह्यातील बेलरायां, संपूर्णानगर, पलिया, गुलरिया या साखर कारखान्यांच्या अनेक ऊस केंद्रांवर केवळ ट्रॅक्टरच्या साह्यानेच ऊस आणला जातो. एक ट्रॉली ४०० ते ५०० क्विंटल ऊस भरून येते.
या ओव्हरलोडेड वाहतुकीला साखर कारखानेही तेवढेच जबाबदार आहेत. तज्ज्ञांच्या मतांनुसार कारखाने आणि राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे नियमांचे पालन होताना दिसत नाही. पण, आता पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. साखर कारखान्यांकडे त्यांच्या सर्व ऊस केंद्रांची मागणी करण्यात आली आहे. त्यांची यादी आल्यानंतर बैठक होऊन कारवाईला सुरुवात होईल, असे जिल्हा पोलिसप्रमुख पूनम यांनी सांगितले.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApP