बरेली, उत्तर प्रदेश: साखर कारखान्यांवर शेतकर्यांचे करोडो रुपये देय आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व साखर कारखाने आणि ऊस अधिक़ार्यांची बैठक घेवून दिवाळीपूर्वी सर्व शेतकर्यांचे ऊसाचे पैसे भागवण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये जर टाळाटाळ केली तर कारवाई केली जाईल, असे सांगितले. बैठकीमध्ये कोणत्याही साखर कारखान्याने शंभर टक्के थकबाकी पूर्ण केलेली नाही हे आढळून आले. डीएम म्हणाले, शासनाकडून 14 दिवसांच्या आत पैसे भागवण्याचे निर्देश आहेत. गाळप हंगाम संपून 5 महिने झाले तरीही देय बाकी आहे. बहेडी साखर कारखान्यावर सर्वात अधिक देय असल्याने त्यांनी ऊस अधिकार्यांना प्रतिदिन निरिक्षण करुन गतीने पैसे भागवण्यास सांगितले आहे. बैठकीमध्ये सर्व साखर कारखान्यांची कॅश क्रेडीट लिमिट, साखर, विक्रीचाही आढावा घेण्यात आला.
बैठकीमध्ये जिल्हाधिकार्यांनी पुढच्या गाळप हंगामाच्या तयारीचीही समीक्षा केली. दरम्यान सर्व साखर कारखान्यांच्या संचालनाची तारीखही निश्चित करण्यात आली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.