कोल्हापूर : गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाला अतिरिक्त प्रति टन चारशे रुपये मिळावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यातून साखर बाहेर पडू न देण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शरद सहकारी साखर कारखान्यापासून काही अंतरावर साखरेचे ट्रक अडविले. कार्यकर्ते ट्रकच्या चाकातील हवा सोडून देऊन ते पसार झाले.
आपल्या मागणीसाठी ‘स्वाभिमानी’तर्फे ढोल-ताशा बजाव आंदोलन करण्यात आले. त्यावेळी साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता द्यावा, तोपर्यंत साखर वाहतूक करू नये, अशी मागणी करण्यात आली. तरीही काही साखर कारखान्यानी साखर वाहतूक सुरू ठेवली. ती बंद पाडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. साखर वाहतुकीचे ट्रक अडविण्यात येत आहेत.