कोल्हापूर : येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यात सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि सुरक्षा सप्ताह मोहीम १९७१ पासून राष्ट्रीय परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त साजरी होते. आर बी. बोंगार्डे यांनी सर्वांना सुरक्षा शपथ दिली.
कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजीराव इंगळे म्हणाले की, सर्व कामगार, कर्मचारी व अधिकारी कारखान्यात काम करीत असताना अपघात होऊ नये यासाठी हेल्मेट, सेफ्टी बूट यांचा वापर करावा. दिवस व रात्रपाळीत काम करताना झोप येणार नाही याची काळजी घ्यावी. कारखान्याचे संचालक सत्यजित पाटील, महेश घाटगे, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील उपस्थित होते. सुदाम देसाई यांनी आभार मानले.