बांगलादेशातील घरांत अदानींच्या विजेचा उजेड, या राज्यातून सुरू झाला पुरवठा

विविध क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या अदानी समुहाची विज कंपनी अदानी पॉवर लिमिटेडने शेजारील देश, बांगलादेशला वीज पुरवठा सुरू केला आहे. कंपनीने यासाठी झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात एक थर्मल पॉवर प्लांट सुरू केला आहे. येथून शेजारील देशात विज पुरवठा सुरू झाल्याने स्थिती खूप बदलेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समूहाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अदानी पॉवर लिमिटेडने झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यात ८०० मेगावॅटचे पहिले अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर जनरेशन युनिट सुरू केले आहे. यासोबतच कंपनीने बांगलादेशला ७४८ मेगावॅट वीज पुरवठा सुरू केला आहे. गोड्डा येथून पुरविण्यात येणाऱ्या विजेमुळे शेजारील देशाची स्थिती सुधारेल. यासोबतच महागड्या तरल इंधनापासून वीज बनवणाऱ्या बांगलादेशला दिलासा मिळेल. विज खरेदीसाठी केल्या जाणाऱ्या सरासरी खर्चात कपात होईल.

अदानी पॉवर लिमिटेडचे सीईओ एस. बी. ख्यालिया यांनी सांगितले की, भारत आणि बांगलादेशच्या जुन्या संबंधांच्या जोरावर गोड्डा पॉवर प्लांट धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. येथून बांगलादेशचा वीज पुरवठा सुलभ होईल आणि उद्योगातील प्रतिस्पर्धा वाढेल. पर्यावरण अनुकूल थर्मल पॉवर प्लांट आपल्या श्रेणीतील जगातील सर्वात चांगल्या प्लांटपैकी एक असेल. हा देशातील पहिला असा प्लांट आहे, ज्याने पहिल्या दिवशी १०० टक्के फ्ल्यु गॅस डिसल्फरायजेशन, एससीआर, शून्य वॉटर डिस्चार्ज केले आहे. यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने अदानी पॉवर लिमिटेडच्या मालकीची अदानी पॉवर झारखंड लिमिटेडशी दीर्घ कालावधीचा करार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here