चौपट ऊस उत्पादनासाठी शेतकरी वापरताहेत रिंगपीट पद्धत

बस्ती : हिवाळ्याच्या कालावधीतील ऊस लागणीसाठी मुंडेरवा साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम दिसू लागला आहे. पहिल्यांदाच या भागातील शेतकऱ्यांनी रिंगपीट पद्धतीचा वापर केला आहे. यातून शेतकऱ्यांना चौपट ऊस उत्पादन मिळेल अशी अपेक्षा आहे. सरकारने मुंडेरवा विभागात ऊस लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी एलएसएस संस्थेकडे जबाबदारी सोपविली आहे. सध्याच्या हंगामात या परिसरात ९३७ हेक्टर ऊस लागवडीचे उद्दिष्ट आहे. यामध्ये रिंगपीट पद्धतीने १०६ हेक्टर क्षेत्रात लागवड केली जाईल.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुंडेरवा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील पुरणपूर गावातील प्रगतशील शेतकरी रामदीन चौधरी यांनी संगितले की, त्यांनी पहिल्यांदाच ०.१२६ हेक्टर क्षेत्रात रिंग पिट पद्धतीने ऊस लागवड केली आहे. त्यासाठी एलएसएसच्या कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहन दिले आहे. रामप्रकाश चौधरी यांनी सांगितले की, त्यांनी ०.१५० हेक्टर क्षेत्रात ऊस लागावड केली आहे. गावातील सात हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे, खते, किटकनाशके, कृषी उपकरणे दिली जात आहेत. संस्थेच्यावतीने सर्व शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत पुरविली जात आहे असे सांगण्यात आले. एलएसएसचे महाव्यवस्थापक डॉ. व्ही. के. द्विवदी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांमध्ये नव्या पद्धतीने ऊस लागवडीविषयी उत्साह आहे. त्यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here