शाहजहांपूर : राज्याचे साखर उद्योगत तथा ऊस विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय भुसरेड्डी यांनी लखनौमध्ये ऊस आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उत्तर प्रदेश ऊस संशोधन परिषदेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या भुसरेड्डीयांनी शेतकऱ्यांमध्ये प्रचलित, प्रसिद्ध असलेले ऊस बियाणे मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी साखर कारखान्यांच्या शेती केंद्रांचा वापर केला जावा. प्रगत ऊस बियाण्याची लागण, त्याची उपलब्धता तसेच महत्त्वाच्या बाबींचा त्यांनी आढावा घेतला.
याबाबत दैनिक अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ऊस संशोधन परिषदेचे संचालक डॉ. व्ही. के. शुक्ला यांनी सांगितले की, २०२१-२२ या वर्षात १.३१ लाख क्विंटल अभिजात बियाण्याचे वितरण करण्यात आले आहे. तर २.४१ एकडोळा बियाण्याचे वितरण करण्यात आले आहे. २०२२-२३ मध्ये बियाणे वितरणासाठी २५५ हेक्टरमध्ये लागवड करण्यात आली गोती. त्यासाठी परिषदेने नऊ केंद्रांसह ऊस बियाणे महामंडळ, बरेली तसेच भारतीय ऊस संशोधन संस्थेच्या कृषी फार्म, १७ खासगी व सहकारी साखर कारखान्यांत नर्सरी सुरू केली. यावेळी भुसरेड्डी यांनी प्रगतशील शेतकऱ्यांकडून बियाणे उत्पादनाबाबत पाहणी करून अहवाल सादर करण्यासाठी विशेष सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याची सूचना केली. अप्पर ऊस आयुक्त (प्रशासन) डॉ. रुपेश कुमार, भारतीय ऊस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. डी. पाठक, उप सचिव सुशील कुमार शुक्ल, लेखाधिकारी उमेश चंद्र आदी उपस्थित होते.