प्रतिकूल हवामानामुळे ब्राझीलमध्ये आगामी हंगामात साखर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. डाटाग्रो कन्सल्टन्सीने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलपासून सुरू होणाऱ्या हंगामात नव्या पिकापासूनचे साखरेचे उत्पादन ३६.७ मिलियन टन होण्याची शक्यता आहे. ब्राझीलच्या मध्य-दक्षिण क्षेत्रात यापूर्वी ३८.५ मिलियन टन उत्पादन होईल असे अनुमान व्यक्त केले होते.
डाटाग्रोने प्रतिकूल हवामानामुळे २०२०-२१ या हंगामात उत्पादन झालेल्या उसाचे ६०७ मिलियन टनावरून २०२१-२२ मध्ये ५८६ मिलियन टनापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
इथेनॉलचे उत्पादन गेल्या हंगामात ३०.६ बिलियन लीटर झाले होते. आगामी हंगामात हे उत्पादन २९.४ बिलियन लिटर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.