शेतकर्‍यांना ऊसासह अंतरपिक शेती करण्याचा सल्ला

कुशीनगर, उत्तर प्रदेश: विकास खंडातील भिसवा बाजारगावामध्ये ऊस विकास बैठकीचे आयोजन करुन शेतकर्‍यांना शरदकालीन ऊसाच्या लागवडीची माहिती दिली. तसेच ऊसामध्ये अंतरपिक शेतीसाठी प्रेरीत करण्यात आले.

ऊस शोध संस्थान गोरखपूर चे सहायक निदेशक ओमप्रकाश गुप्ता यांनी सांगितले की, हाटा ऊस समिती क्षेत्रासाठी ऊस शोध संस्थान सेवरही लक्ष्मीपुर येथून 367 क्विंटल ऊस बियाणांचे वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी आपल्या ऊस पर्यवेक्षकांना भेटून बेयोने प्राप्त करावे. कृषी वैज्ञानिक सुशील भदौरिया यांनी ऊस लागवडी वेळी सरीमध्ये कीटकांच्या नियंत्रणासाठी औषधाचा वापर करण्याबाबत सांगितले. त्यांनी झिंक बरोबर डीएपी चा प्रयोग केल्यास होणार्‍या फायद्याबाबतही सांगितले.

सचिव मुन्नी सिंह यादव आणि ऊस विकास निरीक्षक ओपी सिंह यांनी ऊसाबरोबर सहपीक शेती करण्याचा सल्ला दिला. शेतकर्‍यांनी ऊस वाळण्याची समस्या सांगितली. ज्यावर ऊस तज्ञांनी आवश्यक सूचना केल्या. संचालन रामबडाई यांनी केले. बृज भूषण प्रसाद, उमाशंकर उपाध्याय, रामप्यारे सिंह, दया सिंह, कैलाश जायसवाल, विपिन राय आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here