काबुल : अफगाणिस्तानातील शेतकऱ्यांनी विविध प्रांतांमध्ये पडलेल्या दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना आपल्या पिकाचे उत्पादन नेहमीप्रमाणे मिळेल अशी अपेक्षा नाही. दुष्काळग्रस्त भागात गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या उत्पादनाच्या घसरणीची भीती सतावत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
समाचार रिपोर्टनुसार, अफगाणिस्तानात अलिकडेच झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांची दुष्काळापासून सुटका होईल, अशी अपेक्षा तालिबानच्या नेतृत्वाखालील कृषी आणि सिंचन मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तालिबानच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाचे एक प्रवक्ते मिसबाहुद्दीन मुस्तीन यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील दुष्काळासाठीच्या आपत्कालीन स्थितीसाठीतयारी करण्यात आली आहे. टोलो न्यूजने मिसबाहुद्दीन मुस्तीन यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, जगभरात दुष्काळाची स्थिती वाढत आहे. मात्र, अफगाणिस्तानमध्ये अलिकडेच झालेल्या पावसानंतर याची तिव्रता गतवर्षीपेक्षा कमी असेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.
यादरम्यान, एक शेतकरी अस्ताशन यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून विहिरी आटल्या आहेत. आणि त्यांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. आम्हाला कोणीही मदत करीत नाही. तालिबानच्या नेतृत्वाखालील चेंबर ऑफ ॲग्रीकल्चर अँड इरिगेशनने अलिकडील वर्षात पाणी व्यवस्थापनातील त्रुटींमुळे अफगाणिस्तानमध्ये दुष्काळ वाढल्याचे म्हटले आहे. चेंबर ऑफ ॲग्रिकल्चर अँड इरिगेशनचे उपायुक्त मेरविस हाजी जादा यांनी सांगितले की, जर कोश टेपे कालवा, कमाल खान धरण आणि कुनार जल कालवा मानकांनुसार बांधला गेला असता, तर अफगाणिस्तानला दुष्काळाचा सामना करावा लागला नसता.
टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानला पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे वार्षिक ८० बिलियन क्युबिक मिटरपर्यंत पाणी मिळते. या पाण्याचा वार्षिक वापर २५ बिलियन क्युबिक मिटरपर्यंत पोहोचतो. या वर्षी मार्च महिन्यात अफगाणिस्तानने दुष्काळाच्या वाढत्या चिंतेमुळे संयुक्त राष्ट्रांकडे (यूएन) मदत मागितली होती. आणि यूएनकडे गव्हाच्या साठ्याची मागणी करण्यात आली होती.