नवी दिल्ली : तालीबानच्या हातात काबुल गेल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीत भारत आणि अफगाणिस्तानमधील द्विपक्षीय व्यापारी संबंधांवर खूप परिणाम होणार आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशनचे (एफआयईओ) महासंचालक अजय सहाय यांनी सांगितले की, देशांतर्गत निर्यातदारांना अफगाणिस्तानमधील राजकीय परिवर्तनाच्या स्थितीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
अजय सहाय म्हणाले, यामुळे व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानमधील अनिश्चिततेमुळे व्यापारात घट शक्य आहे. तर एफआयईओचे माजी अध्यक्ष आणि देशातील प्रमुख निर्यातदार एस. के. सराफ म्हणाले, द्विपक्षीय व्यापारात घसरण होणे शक्य आहे. आपल्याला अशा सर्व काही गमावण्याची भीती नाही. कारण त्यांना आमच्या उत्पादनांची गरज आहे.
अफगाणिस्तानाचे भवितव्य अधांतरी बनले आहे. रविवारी काबुलमध्ये ताबिलानने सत्ता हाती घेतली. तत्पूर्वी राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी देश सोडून जाण्याचा मार्ग पत्करला. एफआयईओचे उपाध्यक्ष खालिद खान यांनी सांगितले की, काही काळासाठी व्यापार पूर्णपणे ठप्प होईल. कारण, अफगाणिस्तानमधील सद्यस्थितीत नियंत्रणाबाहेर आहे.
खान म्हणाले, हे हवाई निर्यातीचे एक मुख्य माध्यम आहे. तेथेच आता गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अनिश्चितीतेची स्थिती कमी झाल्यानंतर व्यापार पुन्हा सुरू होऊ शकेल. साई इंटरनॅशनलचे मालक आणि अफगाणिस्तानचे निर्यातदार राजीव मल्होत्रा यांनी सांगितले की भारताची निर्यात पूर्णपणे बंद होऊ शकते. कारण पैशांच्या देवाण-घेवाणीचा मुद्दा मुख्य असेल.
अफगाणिस्तानमधून भारतात अक्रोड, बदाम, अंजीर, पाईन नट, पिस्ता, चेरी, टरबूज आणि औषधी जडी-बुटी आणली जाते. तर भारताकडून चहा, कॉफी, कापूस आणि काळी मिरचीची निर्यात केली जाते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link