मधेपुरा : उदाकिशुनगंज विभागात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे या पिकाबाबत मोठी शक्यता होती. यांदरम्यान, उदाकिशुनगंजमध्ये १६ वर्षांपूर्वी साखर कारखाना उभारण्याच्या योजनेवर काम करण्यात आले होते. कारखाना उभारणीसह राखेपासून इथेनॉलच्या माध्यमातून विज उत्पादनाचा प्रस्ताव होता. कारखाना उभारणी झाली असती तर हा विभागाची प्रगती झाली असती. मात्र, दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतरही कारखाना सुरू झालेला नाही. आता राज्य सरकारच्या नव्या उद्योग धोरणातून आशा पल्लवीत झाल्या आहेत. जर लोकप्रतिनिधी आणि अधिकारी स्तरावर थोडा प्रयत्न झाला तर या विषयावर नव्याने काम करणे शक्य आहे. उसासोबत हा विभाग मक्का उत्पादनासाठी अनुकूल आहे.
याबाबत दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, उदाकिशुनगंज विभागात मधुबन तीनटेंगा व बिहारीगंजमध्ये गमैल मौजातील साडेतीनशे एकर जमिनीवर कारखाना उभारणीसाठी २००६ मध्ये प्रस्ताव करण्यात आला होता. नितीश कुमार यांच्या कार्यकाळातच याबाबत घोषा करण्यात आली . राज्य सरकारने उदाकिशुनगंजमध्ये कारखाना सुरू करण्याविषयी घोषणाही केली. मात्र, कारखाना सुरू झाला नाही. घोषणेनंतर ३० जुलै २००६ मध्ये राज्य सरकारचे तत्कालीन ऊस विकास राज्यमंत्री नितीश मिश्रा, तत्कालीन मंत्री नरेंद्र यादव, आमदार रेणु कुशवाहा यांनी उत्तर प्रदेशातील धामपूर साकर कारखान्याचे मालक विजय गोयल यांची भेट घेतली होती. ऊसाचे सर्वेक्षणही केले होते. भूमी अधिग्रहण प्रक्रियेत २८० एकर जमीन ताब्यात घेण्यात आली. बिहारगंजमध्ये कार्यालय सुरू करण्यात आले. मात्र, एक वर्षानंतर तीनटेंगा गावातील लोकांनी हा विषय हायकोर्टात नेला. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. यावर आता विचार केला जाऊ शकतो असे या विभागातील लोकांचे मत आहे.