पुण्यानंतर कोल्हापूर, मुंबईला अतिवृष्टीचा इशारा

कोल्हापूर, 26 ; पुण्यासह मुंबई व कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. काल रात्री पुण्यात दोन तासात 120 मिलिमीटर पाऊस झाला या पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत केले आता असाच पाऊस मुंबईमध्ये आणि त्यानंतर कोल्हापूरमध्ये होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान काल कोल्हापूर मध्ये दिवसभरात तीन चार वेळा पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी ऊन, दुपारी पाऊस रात्री गारवा असे हवामान आहे. जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नऊ बंधारे पाण्याखाली गेले असले तरीही सकाळी आठनंतर रात्री आठपर्यंत पुन्हा दोन इंचाने पंचगंगा नदीची पाण्याची पातळी कमी झाली. कोयना धरणातून 2 हजार 100 तर अलमट्टीमधून 57 हजार 740 पाण्याचा विसर्ग आजही सुरु राहिला.
काल चोविस तासांत सर्वात अधिक कागल तालुक्‍यात 11.43 मिमी तर सर्वात कमी पाऊस आजरा तालुक्‍यात 1.50 मीमी झाला. जिल्ह्यात 82.18 मिमी इतका पाऊस झाला असून जिल्ह्यात कालपर्यंत पावसाची सरासरी 31 हजार 716.99 मिमी आहे. सरासरी अवघी 6.85 मिमी इतकी नोंद झाली आहे.
——-
बुधवार आणि गुरुवार अखेरची पावसाची तालुका निहाय आकडेवारी :
हातकणंगले – 10.25 एकूण 879.29 शिरोळ -8.57 एकूण 632.29, पन्हाळा -9 एकूण 2513.86, शाहूवाडी
10.50 एकूण 3003.50, राधानगरी 4.83 एकूण 3142.83, गगनबावडा – 2 मिमी एकूण 6980 करवीर –
9.09 एकूण 1861.45, कागल 11.43 एकूण 2006.86, गडहिंग्लज 5.14 एकूण 1527.71, भुदरगड 5.20
एकूण 2751.20, आजरा 1.50 एकूण 3291 व चंदगड 4.67 मिमी एकूण 3127 मिमी.
———-
नऊ बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
भोगावती नदीवरील- खडक कोगे
कासारी नदीवरील – यवलूज
राधानगरी धरणात आज अखेर 8.18 टीएमसी पाणीसाठा
अलमट्टी धरणात 123.081टीएमसी साठा
कोयना धरणात 104.83 टीएमसी साठा
———-
जिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा ; तुळशी 3.45 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.31 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.68 टीएमसी, पाटगाव 3.69 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी
———–
बंधाऱ्यांची पाणी पातळी (काल सकाळी सात वाजता) राजाराम 20.6 फूट, सुर्वे 20.6 फूट, रुई 51.6 फूट, इचलकरंजी 49.6 फूट, तेरवाड 43 फूट, शिरोळ 42.6 फूट, नृसिंहवाडी 43.6 फूट, राजापूर 33 फूट तर सांगली 25.3 फूट अंकली 27.7 फूट

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here