साखरेपाठोपाठ उत्तर प्रदेश बनले सर्वात मोठे इथेनॉल उत्पादक राज्य

लखनौ : देशातील सर्वात मोठे साखर उत्पादक राज्य असलेल्या उत्तर प्रदेशने आता इथेनॉल उत्पादनातही आघाडी घेऊन सर्वाधिक इथेनॉल उत्पादन करण्याचा मान पटकावला आहे. राज्यात २०१९-२० या हंगामात २ डिस्टीलरी होत्या. आता २०२०-२१ या गळीत हंगामात राज्यात तब्बल २० डिस्टीलरी झाल्या आहेत.

राज्य सरकारकडून उपलब्ध आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशने १२६.१ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन केले आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे साखरेच्या दरात घसरण होते. त्यामुळे साखर कारखानदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्यात अडचणी येतात. त्यामुळे आता सरकारकडून इथेनॉलच्या उत्पादनासाठी थेट ऊसापासून रस निर्मितीवर भर मिळत आहे.

राज्य सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, पक्ष सत्तेवर आल्यापासून २०१७ मध्ये ऊसाची थकीत बिले हा सर्वात मोठा प्रश्न होता. मात्र, सरकारने केवळ शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले मिळवून दिलेली नाहीत, तर राज्यातील सुमारे २४ साखर कारखान्यांचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण सुरू केले आहे. ऊस विभागाने केल्या नऊ महिन्यात सॅनिटायझर उत्पादनातून आपल्या महसूलात भरही घातली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here