अहिल्यानगर : अकोले तालुक्याच्या विकासासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २३०० कोटी रूपयांचा निधी दिला. याचबरोबर अगस्ती कारखान्याला एनसीडीसीचे ९४ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. कर्ज मिळविण्यासाठी माझ्या प्रयत्नांबरोबरच खरी मेहनत अध्यक्ष सीताराम गायकर यांनी घेतली आहे. कारखाना ३१ व्या गळित हंगामात साडेचार लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करेल, अशी माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन आमदार लहामटे यांच्या हस्ते झाले.
कारखान्याचे अध्यक्ष गायकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चांगला निर्णय घेऊन कारखान्याना मदत करण्याचे धोरण घेतले. या हंगामात साडेचार लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण करू. रोलर पूजनासाठी ज्येष्ठ नेते कारभारी उगले, बाजार समिती सभापती भानुदास तिकांडे, सुरेश नवले, नितीन नाईकवाडी, संदिप शेणकर, पाटिलबा सावंत, कार्यकारी संचालक सुधीर कापडणीस, नगरसेवक नवनाथ शेटे बसले होते. कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनिताताई भांगरे, ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकरराव नवले, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, संचालक मच्छिद्र धुमाळ, अशोकराव देशमुख, पर्बतराव नाईकवाडी, अशोकराव आरोटे, विकास शेटे, बाळासाहेब नाईकवाडी, सचिन दराडे, कैलास शेळके, सुधीर शेळके, संचालक सुलोचना नवले, शांताबाई वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष अक्षय अभाळे, अंकुश वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी मधुकरराव नवले, कारभारी उगले यांची भाषणे झाली. नामदेव शेटे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रदिप हासे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.