ऊस थकबाकीसाठी रामराज थान्यावर धरणे आंदोलन

मेरठ : भारतीय किसान यूनियन चे राष्ट्रीय अध्यक्ष चौ. नरेश टिकैत यांच्या आवाहनावर सोमवारी रामराज थाना परिसरातमध्ये ऊस थकबाकी सह 9 मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. भाकियू कार्यकर्त्यांची मागणी होती की, शेतकर्‍यांना त्यांची ऊस थकबाकी व्याजासहित मिळावी. यूनियन पदाधिक़ार्‍यांनी याबाबत एसडीएम जानसठ यांना निवेदन दिले. एसडीएम यांच्या आश्‍वासनानंतर संध्याकाळी उशीरा आंदोलन थांबवण्यात आले. दरम्यान जीएम साईम अंसार आणि शेतकर्‍यांमध्ये बाचाबाचीही झाली.

रामराज थाना परिसरामध्ये सुरु असणार्‍या धरणे ओंदोलनाचे नेतृत्व भारतीय किसान यूनियनचे वरीष्ठ पदाधिक़ारी चौ. उदयवीर सिंह आणि अशोक घटायन यांनी केले. नऊ मागण्यांच्या पत्रात शेतकर्‍यांनी प्रत्येक 14 दिवसानंतर थकबाकी भागवली जावी, बोरवेल कनेक्शन लवकर मिळावे, शेतकर्‍यांना सामान्य योजनेअंतर्गत बोरवेल कनेक्शन देणे, सर्व शेतकर्‍यांना शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळावा, शेतकर्‍यांच्या प्रलंबित समस्यां लवकरात लवकर सोडवाव्यात यासह अनेक मागण्यांचा समावेश होता. किसान यूनियन च्या धरणे आंदोलनामुळे घाबरलेल्या टिकोला साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना 10 दिवसांचे 19 करोड 16 लाख रुपयांचे देय संबंधीत समितीकडे पाठवले आहे. एसडीएम जानसठ अशोक कुमार यांना निवेदन देताना प्रल्हाद सिंह, नवीन चौधऱी, महबूब प्रधान, मुन्ना ठाकुर, राजेंद्र बाीलियान, सुदेश पाल, प्रधान राजपाल चौहान, देवेंद्र सिंह, खालीद गुर्जर, भीम सिंह, जगदीप उर्फ दीपा, मोनिश, परवेज, आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी राजसिंह होते तर सूत्रसंचालन प्रधान महबूब अली यांनी केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here