थकीत एफआरपी ३० एप्रिलपर्यंत न दिल्यास आंदोलन : शेतकरी संघटनेचा इशारा

अहिल्यानगर : अशोक कारखाना व्यवस्थापनाने गाळप झालेल्या संपूर्ण उसाचे ३० एप्रिलपर्यंत एफआरपी पेमेंट त्वरित अदा करावे, अन्यथा शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी दिला आहे. कारखाना उसाला २७०० रुपये प्रती टन दर देतो. मात्र, साखर ३५०० रुपये क्विंटल आहे. इतर उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प असतानाही कारखाना १५ जानेवारीपासूनचे ऊस पेमेंट करण्यास असमर्थ ठरला आहे, असा आरोप त्यांनी केला.

जिल्हाध्यक्ष औताडे म्हणाले की, सभासदांनी एकहाती सत्ता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याकडे दिली आहे. नुकतीच त्यांनी गाळप हंगामाची सांगता केली. संचालक मंडळ केंद्राच्या धोरणावर व साखरेच्या दरावर बोट दाखवून ऊस उत्पादकांची दिशाभूल करत आहे. याबाबत आंदोलन करणार आहे, असा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, सुदामराव औताडे, साहेबराव चोरमल, डॉ. दादासाहेब आदित, डॉ. विकास नवले, शरद असणे, गोविंद वाघ, शरद पवार, प्रभाकर कांबळे, राजेंद्र कोकणे, विष्णुपंत खंडागळे, बंडू पाटील पटारे, दिलीप औताडे, शैलेश वमने, शिवाजी ताके, सतीश नाईक, तुषार ताके, दत्ता जानराव, शिवाजी दांगट, प्रभाकर पटारे, सुभाष पटारे, इंद्रभान चोरमल, कडू पवार आदींनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here