ऊस खरेदी केंद्रावरील अडचणींमुळे नाराज शेतकऱ्यांचे आंदोलन

बलरामपूर : इमिलिया ऊस खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी उसाचे वजन करण्यास नकार दिल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले. ऊस वजन करताना मनमानी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकरी किशुन कैराती, सुरेश कुमार, घनश्याम , मेवालाल, कन्हैयालाल, दुर्गेश व आज्ञाराम वर्मा यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून ते इमिलिया ऊस खरेदी केंद्रावर आपल्या ऊसाचे वजन करण्यासाठी रांगेत थांबले आहेत. मात्र, केंद्राच्या प्रमुखांकडून त्यांच्याकडील ऊस मंजुरी नसलेल्या प्रजातीचा असल्याचे सांगून वजन करण्यास नकार देण्यात आला आहे.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पुत्तुलाल वर्मा यांनी सांगितले की, साखर कारखाना प्रशासनाने २०२० मध्ये शेतकऱ्यांना कोशा ८२७२ प्रजातीचा ऊस दिला होता. शेतकरी छेदीलाल यांनी सांगितले की त्यांच्या शेतात अद्याप खोडवा ऊस पिक उभे आहे. त्याच्या तोडणीनंतर गव्हाची पेरणी केली जाणार आहे. मात्र, आता ऊसाची प्रजाती नामंजूर करून शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे. साखर कारखाना प्रशासनाने बियाणे पुरवठा केल्यानंतर दुसऱ्या वर्षी ते खरेदी न करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप छोटेलाल, नरेंद्र कुमार व गुड्डू सिंह यांनी केला. दरम्यान, तुलसीपुर साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक आर. पी. शाही यांनी सांगितले की, चौथ्या स्तंभापर्यंत लवकरचे वाण खरेदी केले जाते. काही काही शेतकऱ्यांनी सामान्य प्रजातीचा ऊस आणला होता, त्यामुळे त्याचे वजन केले नव्हते. नंतर त्यांचे वजनही करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कुमार यांनी या प्रकरणाचा तपास उप जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here