गोंडा : पूर्वांचल साखर कारखाना यूनियन आणि उत्तर प्रदेश साखर कारखाना कामगार संघर्ष समितीच्या वतीने कारखान्यात काम करणार्या कामगारांच्या पागरवाढीसाठी मोर्चा काढण्यात आला. तसेच उपश्रमायुक्त यांच्या कार्यालयाच्या समोर घोषणाबाजी करुन धरणे आंदोलनही करण्यात आले. साखर कामगार गेल्या काही काळापासून वेज बोर्डची मागणी करत आहेत, पण त्यांच्या या मागणीची दखल घेतली गेेली नाही. या मागणीचे निवेदनही संघटनांनी उपश्रमायुक्तांना दिले आहे. शेतकरी संघटनेचा आरोप आहे की, वेगवेगळ्या स्तरातील कामागारांना मिळणारा पगार वेज बोर्डानुसार नाही.
कारखान्याकडून कामगारांना जवळपास 10 ते 50 हजार रुपयांपर्यंत कमी पगार दिला जात आहे. यामुळे कामागारांवर अन्याय होत आहे. त्यांचे शोषण केले जात आहे. श्रमिकांचे नेता सत्य नारायण त्रिपाठी म्हणाले, कामगारांना पगार देण्यामध्ये वेज बोर्ड आणि कायदा या दोन्ही गोष्टी कारखान्यांनी धाब्यावर बसवल्या आहेत. कारखाने अनेक वर्षांपासून कामगारांचे शोषण करत आहेत. पण आता त्यांनी मनमानी चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.