संजीवनी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिलांसाठी आंदोलन

फोंडा : थकीत बिलांबाबत चिंतेत असलेल्या संजीवनी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ६ डिसेंबरपर्यंत थकबाकी न मिळाल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशासकांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मात्र, यावेळी प्रशासक उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सहा डिसेंबरपर्यंत बिले न मिळाल्यास बेमुदत धरणे आंदोलनाचा अल्टिमेटम दिला आहे.

आपल्या उजजिविकेबाबत आणि भवितव्याबाबत चिंतीत असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले की, सरकार कृषी विभागाच्या माध्यमातून इथेनॉल युनिट कधी सुरू करेल याची शाश्वती नाही. संजीवनी साखर कारखान्याबाबत शेतकऱ्यांनी १२ नोव्हेंबर रोजी घेतलेल्या बैठकीत २४ नोव्हेंबरपर्यंत प्रलंबीत पैसे न मिळाल्यास आणि साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट सुरू करण्याबाबत स्पष्टता नसल्याने आधीच आंदोलनाचा इशारा दिला आहे.

वर्ष २०२१-२२ मधील नुकसान भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांनी सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय, सरकारकडून साखर कारखाना परिसरात इथेनॉल प्लांट कधी सुरू होईल, याबाबतही स्पष्टता नाही. या दोन्ही मुद्यांवर कारखाना परिसरात आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here