कोल्हापूर, दि. 23 : गेल्या गळीत ऊस हंगामात साखरेचे दर चांगले होते. त्यामुळे, एफआरपी अधिक 200 अस दर जाहीर करून हंगाम सुरू झाला. यावर्षी मात्र (2018-19) प्रारंभी साखर दराचा गोडवा कमी झाला असल्याने तसेच जादा दरासाठी विविध संघटना आणि पक्ष ज्यादा ऊस दरासाठी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
गेल्या गळीत हंगामात (2017-18) एफआरपी सरासरी 2800 ते 2900 प्रतिटन इतकी राहिली. शॉर्ट मार्जिनमुळे अपुरा साखर कारखान्यांना एफआरपी देणे शक्य झाले नाही. त्यामुळे 2800 रुपयांवरील दर 2500 रुपयांपर्यंत खाली आला याशिवाय जादाचे दोनशे रुपये अद्यापही दिलेले नाही. बहुसंख्य साखर कारखान्यानी एफआरपीही दिलेली नाही. त्यामुळे ऊस (नियंत्रण) आदेश 1966 चे कलम3(3) मधील तरतुदीनुसार 14 दिवसांत एफआरपी देण्याचे बंधनकारक आहे. या कालावधीत ती अदा केली नाही तर कलम 3(3अ) अन्वये ऊस उत्पादकांना विलंब काळापर्यंत 15% व्याज द्यावे अशी मागणी केली जात आहे.
मात्र या वर्षी याच मुद्द्यावर सह इतर ऊस दर मागणीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात साखर कारखाने हे आंदोलनाने सुरू होणार अशी परिस्थिती निर्माण झाली.