महमुदाबाद (सीतापूर) : महमुदाबाद येथील दी किसान सहकारी साखर कारखान्यात कर्मचाऱ्यांना गेल्या गळीत हंगामातील आणि या हंगामातील नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याचे वेतन मिळालेले नाही. थकीत वेतन मिळावे यासाठी कामगारांनी सर व्यवस्थापकांच्या कार्यालयाला घेराओ घातला. चक्काजाम आंदोलन करून मशीन बंद पाडले.
गुरुवारी थकीत वेतन आणि थकीत देणी मिळावीत यासाठी कामगारांनी सर व्यवस्थापकांच्या कार्यालयाला घेराओ घातला. त्यामुळे कारखान्यात गोंधळ उडाला. सर्व कर्मचाऱ्यांनी काम बंद केले. सर्वजण एकत्र येऊन थकीत वेतन देण्याची मागणी करत घोषणाबाजी करू लागले. त्यांनी कारखान्यातील मशिनही बंद पाडली. त्यानंतर सर व्यवस्थापकांनी कामगारांची समजूत घातली. त्यानंतर कारखान्यातील कामकाज पूर्ववत झाले.
सर व्यवस्थापक आलोक कुमार यांनी सांगितले की, त्यांना महमुदाबाद येथे येऊन फक्त दीड महिना झाला आहे. कर्मचाऱ्यांना गेल्या हंगामातील मार्च आणि एप्रिल महिन्यातील वेतन मिळाले नव्हते. ते देण्यात आले आहे. मेडिकल, बोनस या सुविधांसह कायम कर्मचाऱ्यांच्या ऑक्टोबर महिन्याचा पगार देण्यात आला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पगार देय आहे. त्यासाठी एक आठवड्याची मुदत कर्मचाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. आठवडाभरात हे पैसे त्यांना दिले जातील.