उसाच्या संशोधनाबाबत PAU आणि शुगरफेडमध्ये चर्चा

चंदीगढ : पंजाब कृषी विद्यापीठाने (Punjab Agricultural University/PAU)
राज्यात ऊस संशोधन आणि विकास वाढविण्यासाठी उद्योगातील तज्ज्ञांच्या एका दौऱ्याचे आयोजन केले होते. शुगरफेड पंजाब (Sugarfed Punjab) चे कार्यकारी संचालक अरविंद पाल सिंह संधू यांनी असोसिएशनचे महाव्यवस्थापक तथा ऊस सल्लागार कंवलजीत सिंह आणि बटाला सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे महाव्यवस्थापक अरविंदर पाल सिंह कैरों यांच्यासोबत विद्यापीठाचा दौरा केला.

या बैठकीस PAU चे कुलपती सतबीर सिंह गोसल, विद्यापीठाचे अधिकारी, विषयतज्ज्ञांसह उद्योगातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या. यावेळी संधू यांनी ऊसाच्या उच्च शुक्रोज व उत्पादन देणाऱ्या प्रजातींच्या विकासावर भर दिला. याचा फायदा उद्योग आणि शेतकऱ्यांना होईल, असे ते म्हणाले. उसाच्या टाकावू पदार्थांपासून इथेनॉल उत्पादनावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

PAU चे कुलपती एस. एस. गोसल यांनी रोगमुक्त बियाणे उत्पादन, चांगल्या प्रजातींचे संरक्षण करण्यासह प्रसारात टिशू कल्चर अथवा मायक्रोप्रोपेगेशन क्षमतेकडे लक्ष वेधले. संशोधन संचालक अजमेर सिंह धट्ट यांनी ऊस रोपणासाठी संशोधित प्रजातींचा वापर करण्याकडे लक्ष वेधले. धट्ट यांनी शेतकरी, साखर कारखानदार यांच्या परस्पर लाभावर प्रकाश टाकताना सहकारी साखर कारखान्यांना पिक संशोधन, विकास कार्यक्रमात भागिदारी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

शुगरफेड पंजाबतर्फे नऊ सहकारी साखर कारखान्यांचे व्यवस्थापन केले जाते. शेतकऱ्यांना कीडमुक्त बियाणे, किड नियंत्रण उपाय, ऊसाची वेळेवर खरेदी, बिले देणे यासाठी मदत करते. १.८० लाख शेतकरी राज्यातील साखर कारखान्यांशी जोडले गेलेले आहेत. त्यातून ऊस उद्योगाचे महत्त्व अधोरेखित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here