बहरीन शुगर रिफायनरीसाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी

सलमान इंडस्ट्रियल सिटी : बहरीनच्या उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाने बहरीन शुगर रिफायनरीसाठी सलमान इंडस्ट्रियल सिटीमध्ये १,०७,००० वर्ग मिटर औद्योगिक भुखंड देण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

बहरीन शुगर रिफायनरीने सार्वजनिक लिलावात २१.२ मिलियन डॉलरची बोली लावल्यानंतर साखर कारखान्याचे अधिग्रहण केले आणि पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीदरम्यान जवळपास ६,००,००० मेट्रिक टन प्रती वर्ष साखर उत्पादन क्षमतेसोबत काम सुरू करण्याची अपेक्षा आहे. कंपनीने एकिकृत औद्योगिक क्षेत्रांमध्ये नवी उत्पादन श्रृंखला स्थापन करून भविष्यात कारखान्यांचे संचालन आणि विस्तारासाठी जवळपास BD७०m गुंतवणूक करण्याची योजनाही तयार केली आहे. यामुळे कारखान्याकडून २०० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here