नवी दिल्ली: केंद्र सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या पॅकेजच्या मदतीने अनेक साखर कारखान्यांनी इथेनॉलच्या उत्पादनाला गती दिली आहे. त्यामुळे यंदाच्या गळीत हंगामात, २०२०-२१ मध्ये साखर उत्पादन ३०२ मिलीयन टन या नव्या अनुमानापेक्षा कमी होईल अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अनेक कारखान्यांनी ऑईल मार्केटिंग कंपन्यांशी करारही केला आहे.
याबाबत उपलब्ध माहितीनुसार, सद्यस्थितीत असलेली ३.५ अब्ज लिटर प्रतिवर्ष इथेनॉल उत्पादन क्षमतेच्या माध्यमातून या आर्थिक वर्षामध्ये साधारणतः ७.५ टक्के ते ८ टक्क्यांपर्यंत पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे टार्गेट पूर्ण करता येणे शक्य आहे. मात्र, देशातील अनेक साखर कारखान्यांनी आर्थिक वर्ष २०२१ मध्ये ७.१ अब्ज लीटरच्या इथेनॉल पुरवठ्याबाबत ऑईल मार्केटींग कंपन्यांशी करार केला आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) एका सदस्यांनी सांगितले की, या हंगामात इथेनॉलचे होणारे वाढते उत्पादन लक्षात घेता साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.