नवी दिल्ली : केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी कृषी क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूक वाढवण्यावर जोर दिला आहे. चरण सिंह विश्वविद्यालय, मेरठ आणि जुनागड कृषी विश्वविद्यालयाकडून आयोजित एका राष्ट्रीय वेबिनारला संबोधित करताना तोमर म्हणाले, खाजगी गुंतवणूक वाढल्यामुळे कृषीक्षेत्रामध्ये समृद्धी वाढेल. ज्यामुळे देशामध्ये आत्मनिर्भरता आणि समृद्धी देखील वाढेल. त्यांनी वैज्ञानिकांना कृषी उत्पादनावर जोर देणे आणि शेतकर्यांच्या अडचणी कमी करण्याचे मोठे आव्हान केले. त्यांनी सांगितले की, खाद्यान्न उत्पादनामध्ये भारत केवळ आत्मनिर्भर नाही, तर अधिशेषही आहे. शेतकर्यांनी पाहिले की, ते कठीण आव्हानांचा सामना करण्यास सक्षम आहेत.
तोमर म्हणाले की, कृषी क्षेत्रामध्ये खाजगी गुंतवणूकीला आकर्षित करण्याच्या संदर्भात, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक लाख करोड रुपयांची घोषणा केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री यांनी कमी पाण्याबरोबरच चांगल्या कृषी उत्पादनावर जोर दिला आहे. कोरोना संकटात जेव्हा जगातील अर्थव्यस्थेत मंदी आली होती, तेव्हा भगारतीय शेतकर्यांनी ग्रामीण भागामध्ये उपलब्ध साधसनांच्या साथीने भरपूर पीक घेतले. पीकाची कापणी देखील सामान्य गतीने झाली. हे आमच्या गावाची आणि शेतकर्यांची ताकद दाखवते. तोमर म्हणाले की, कोणत्याही अन्य सरकारने मोदी सरकार प्रमाणे कृषी आणि शेतकरी कल्याणसाठी इतका निधी उपलब्ध केलेला नाही. पीएम शेतकरी योजनेला आधी पूर्ण कृषी बजेटच्या तुलनेत अधिक बजेटचे वाटप केले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.