मुंबई : साखर कारखान्यांनी निर्यात वाढवावी यासाठी केंद्र सरकारने अनुदान योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार साडेचार कोटी रुपयांचे अनुदान जाहीर करुन 50 लाख टन साखर निर्यात करण्याचे उद्दीष्ट दिले. सरकारने मागील हंगामात जाहीर केलेल्या उनदानाची रक्कम कारखान्यांना मिळाली नाही. सरकार या साखर निर्यात अनुदानाचे प्रलंबित एक हजार कोटी दोन आठवड्यात देण्याची शक्यता आहे.
देशात 2018-19 या गाळप हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर बाजारात साखरेचा अतिरिक्त पुरवठा झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारने कारखान्यांना साखर निर्यात करण्यास सांगितले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेचे दर दबावात असल्यामुळे कारखान्यांना निर्यात करणे आतबट्याचे झाले होते.
चालू साखर हंगामात केंद्र सरकार 60 लाख टन साखर निर्यातीसाठी साखर कारखान्यांना 6 हजार 720 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. त्यानुसार साखर निर्यातीसाठी प्रतिकिलो 10.45 रुपये अनुदान मिळणार आहे. गेल्या हंगामात कारखान्यांनी 38 लाख टन साखर निर्यात केली. यानुसार कारखान्यांना 2 हजार 900 ते तीन हजार कोटी अनुदान मिळणे अपेक्षित होते. यापैकी एक हजार कोटी रुपये केंद्र सरकारने यापूर्वीच दिले आहेत. तर एक हजार कोटी लवकरच देणार आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.