मुंबई : गेल्या वर्षी महापूर आणि दुष्काळामुळे ऊसाचे अपेक्षित उत्पादन झाले नाही, पण यंदा ऊसाचे अधिक उत्पादन लक्षात घेऊन या वर्षी ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबर पासून सुरु होणार असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
यंदाच्या अर्थात २०२०-२१ च्या ऊस गाळप हंगामाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. गुरुवारी झालेल्या या बैठकीमध्ये राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२० पासून सुरु करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
यावेळी बोलताना सहकार मंत्री पाटील म्हणाले, गतवर्षी गाळप हंगाम उशीरा म्हणजे २२ नोव्हेंबरला सुरु झाला होता. शिवाय नैसर्गिक संकटांनी ऊस उत्पादनावर परिणाम झाला होता.
पण यंदा ऊसाचे अधिक उत्पादन अपेक्षित आहे. त्याच्या नियोजनासाठी ऑक्टोबर महिन्यात गाळप हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा राज्यभरात चांगले ऊस उत्पादन अपेक्षित आहे.यंदा मागील वर्षी पेक्षा जास्त कारखाने सुरु होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही सहकार मंत्र्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.