सांगली: गेल्या वर्षी झालेला महापूर आणि काही भागात पडलेला दुष्काळ यामुळे ऊसाचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता होती. पण सांगली जिल्ह्यात 98 हजार 790 हेक्टरवर ऊस लागवड झाली. अर्थात 2 हजार 363 हेक्टरने ऊस क्षेत्र वाढले. पण आडसाली ऊस क्षेत्रात मात्र घट झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या तीन वर्षाचा आढावा पहिला तर दरवर्षी पाच ते सहा हजार हेक्टरने असाच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गतवर्षी 95 हजार हेक्टरवर ऊस क्षेत्र होते. त्यामुळे गाळपाची स्पर्धा आवश्यक होती. जिल्ह्यात वाळवा, पलूस, कडेगाव, मिरज, शिराळा यासह दुष्काळी पट्ट्यात ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
दरम्यान, गेल्या वर्षी कृष्णा आणि वारणा नदीला ऑगस्ट महिन्यात महापूर आला. त्यामुळे कारखाने सुरु व्हायला उशिर झाला. तसेच जुलै ऑगस्टमध्ये अडसाली ऊसाची लागवड होते. पंरतु आडसाली ऊसाची लागवड झाली नाही. ऊस पट्ट्यात जुलै ते ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने ऊस लागवड केली जाते. त्यानुसार शेतकर्यांनी लागवडीसाठी शेती तयार करुन ठेवली होती. पण याच दरम्यान महापूरामुळे आडसाली ऊसाची लागवड करण्याचे नियोजन कोलमडल्याने आडसाली क्षेत्रात घट झाली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.