कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या कार्यस्ळावर वाहनधारक व साखर कारखाना व्यवस्थापन यांच्यात दरवाढी संदर्भात बैठक झाली. या बैठकीत ऊस वाहतूकदारांना 9 टक्के वाढ देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर शिरोळ , हातकणंगले तालुक्यातील ऊसतोडणी वाहतूक बंद आंदोलन मागे घेण्यात आल्यामुळे दोन्ही तालुक्यातील कारखान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
या बैठकीत वाहतूकदारांनी आपल्या अडचणी सांगितल्या, त्यानुसार या अडचणींवर सविस्तर चर्चा होवून तोडगा काढण्यात आला. दरम्यान, बाजारातील साखरेच्या दरामुळे साखर उद्योगासमोर मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही बाब वाहनधारकांनी समजून घ्यावी, असे आवाहनही कारखाना व्यवस्थापनाकडून करण्यात आले.
यावेळी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, कार्यकारी संचालक एम.व्ही. पाटील, शेती अधिकारी श्रीशैल हेगाणा, विजय जाधव, सी.एस. पाटील, जिल्हा ऊस वाहतुक संघटनेचे उपाध्यक्ष श्रीकांत गावडे, धनाजी पाटील नरदेकर, संभाजी जाधव आदी उपस्थित होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.