ॲग्रीमॅक्स डिस्टिलरी (Agrimax Distillery), पंजाबच्या रुपनगर जिल्ह्यातील कुकुवाल गावात १५० klpd क्षमतेची एक धान्यावर आधारित युनिट स्थापन करण्याची योजना तयार करीत आहे.
प्रस्तावित युनिट २८.१५ एकर जमिनीवर उभारण्यात येईल आणि यामध्ये चार मेगावॅट (MW) चा को जनरेशन प्लांटही स्थापन केला जाणार आहे.
प्रोजेक्ट्स टुडेकडून मिळालेल्या नव्या अपडेट्नुसार, Agrimax Distillery योजनेवर Q३/FY२३ काम सुरू करेल अशी अपेक्षा आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत हा प्रोजेक्ट उभरला जाईल असे नियोजन करण्यात आले आहे.
कंपनी सद्यस्थितीत पर्यावरण मंजुरीची (ईसी) प्रतीक्षा करीत आहे. आणि यासोबतच योजनेसाठी ठेकेदारांच्या नियुक्तीला अंतिम रुप दिले जात आहे.