अहिल्यानगर : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अखेरच्या दिवशी १४२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आजअखेर १८० अर्ज दाखल झाले आहेत. सर्वसाधारण गटात कोल्हारमध्ये १३, देवळाली प्रवरा गटात १८, टाकळीमियामध्ये ३०, आरडगाव २७, वांबोरी १७ व राहुरी १४ असे ११९ अर्ज दाखल झाले आहेत.
माजी आमदार प्राजक्त तनपुरे, राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा मंडळाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केली आहेत तर आमदार शिवाजी कर्डिले यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने त्यांच्या नेतृत्वाखाली अर्ज दाखल झाले आहेत. त्याचबरोबर राहुरी कारखाना बचाव कृती समितीचे अध्यक्ष अमृत धुमाळ, अजित पाटील कदम यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने तर युवा नेते राजूभाऊ शेटे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास मंडळाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
उत्पादक गटात अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये बहुसंख्या आजी-माजी संचालकांचा समावेश आहे. युवा नेते सत्यजित कदम, हर्ष तनपुरे, उदयसिंह पाटील, अरुण तनपुरे, अनिल शिरसाठ, रवींद्र म्हसे, सुरेश बानकर, उत्तमराव खुळे, संजय पोटे, भरत पेरणे, अजित कदम, महेंद्र तांबे, विक्रम तांबे, आप्पासाहेब दूस आदींचा समावेश आहे. बिगर उत्पादक गटामध्ये सात अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये हर्ष तनपुरे, सुधीर तनपुरे, कारभारी खुळे, रायभान काळे, दत्तात्रय खुळे, अँड. तान्हाजी धसाळ व ज्ञानेश्वर खुळे यांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती जमातीसाठी पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले असून त्यामध्ये हरिभाऊ खामकर, नामदेव झरेकर, नंदकुमार डोळस, विजय कांबळे, अरुण ठोकळे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. महिला राखीवसाठी १७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये प्रमिला शिरसाठ, शैलजा धुमाळ, राजश्री तनपुरे, अनिता जाधव, सुनीता कोळसे, उषा मांगुर्डे, सपना पुजारी, विमल जाधव, स्वाती उरे, कौशल्याबाई शेटे, लिलाबाई येवले, जनाबाई सोनवणे, लताबाई पवार, अलका वाळुंज, प्रमिला शिरसाठ, सुनिता तनपुरे, हिराबाई आढाव यांचे अर्ज दाखल झाले आहेत.
इतर मागासवर्गीय विभागात १८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये आप्पासाहेब दूस, संजय पोटे, सुरेश शिरसाठ, रावसाहेब तनपुरे, सतीश बोरुडे, अनिल शिरसाठ, संतोष खाडे, शिवाजी सागर, जनार्दन गाडे, हर्ष तनपुरे, दत्तात्रय शेळके, बाळासाहेब जाधव, दिलीप इंगळे, अशोक ढोकणे, प्रमोद कोळसे, सुरेश थेवरकर, राहुल म्हसे, आप्पासाहेब गावडे यांचा समावेश आहे. भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये १४ असून संजय तमनर, भाऊसाहेब तमनर, विठ्ठल वडीतके, आशिष बिडगर, अशोक तमनर, गंगाधर तमनर, कोंडीराम विटनोर, अण्णा बाचकर, भीमराज बाचकर, अण्णा विटनोर, शीला थोरात, यमनाजी आघाव, मोहनीराज धागुडे, दिलीप गोसावी यांचे अर्ज दाखल झाले आहेत.