अहिल्यानगर : माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी आयुष्यात संघर्ष करत नियमांचे सतत पालन केले. त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेवुन संजीवनी उद्योग समुहाची प्रगतीकडे झेप सुरू आहे. गळीत हंगामात कारखान्यांने ७ लाख मे. टन उस गाळपाचे उददीष्ट ठेवले आहे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी केले. तालुक्यातील शिंगणापूर येथील कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सालाबादप्रमाणे याही वर्षी दीपावली पर्वावर शुक्रवारी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या हस्ते लक्ष्मीपुजन पार पडले. यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रास्तविकात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीची घौडदौड सांगत सीएनजी प्रकल्प अंतीम टप्प्यात असल्याचे सांगून चालू सर्व उपप्रकल्प जोमाने चालविण्यासाठी त्याची सर्व पुर्वतयारी बिपीन कोल्हे व व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगितले. कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे व सर्व विद्यमान संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी ज्येष्ठ नेते दत्तात्रय कोल्हे, कारखान्याचे संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, त्रिंबकराव सरोदे, शिवाजीराव वक्ते, संजय होन, आप्पासाहेब दवंगे, सोपानराव पानगव्हाणे, मोहनराव वाबळे, शिवाजीराव कदम, पांडुरंगशास्त्री शिंदे, बाळासाहेब शेटे, डॉ. गुलाबराव वरकड, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, ज्ञानदेव औताडे, रमेश आभाळे, राजेंद्र कोळपे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.