अहिल्यानगर : श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याने कारखान्याने मागील हंगामात २ लाख १७ हजार टन ऊस गाळप केले. कारखान्याच्या इतिहासात प्रथमच उसाला ३,००० रुपये दर दिला आहे. तर कर्मचाऱ्यांना पगार बोनस यासह रिटेन्शन रक्कम देण्यात आली. त्यामुळे प्रथमच आनंदात दिवाळी साजरी करीत असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. उसाला २०२३-२४ या हंगामात सर्वाधिक तीन हजार रुपये दर मिळाला आणि कर्मचाऱ्यांचेही प्रश्न सुटण्यास मदत झाली. त्याबद्दल फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जिल्ह्यात सहकारी कारखान्यात सर्वाधिक गाळप उतारा गणेशचा निघाला. उसाची उपलब्धता कमी असताना देखील हंगाम यशस्वी करून दाखवला त्याचप्रमाणे चालू हंगामात देखील एकजुटीने कार्यरत राहू. आ. बाळासाहेब थोरात व कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अनेक अडचणी आल्यानंतरही कारखाना यशस्वी सुरू केला. अनेक राजकीय अडचणी कारखान्याला कर्ज मिळण्यासाठी आल्या त्यावर मात करून घडी बसविण्यात यशस्वी झालो आहोत, असे संचालकांनी सांगितले. चेअरमन सुधीर लहारे, व्हा. चेअरमन विजय दंडवते, अॅड. नारायण कार्ले, भगवानराव टिळेकर, डॉ. एकनाथ गोंदकर, अनिल गाढवे, बाळासाहेब चोळके, महेंद्र गोर्डे, संपतराव हिंगे, अरविंद फोपसे, आलेश कापसे, नानासाहेब नळे, विष्णुपंत शेळके, संपत चौधरी, विनायक देठे, सचिन आहेर, सुभाष कापसे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.