अहिल्यानगर : पंचगंगा शुगरच्या ऊस उत्पादक सभासदांना जिल्हा बँक पीक कर्ज देणार

अहिल्यानगर : पंचगंगा शुगर अँड पावर प्रा. लि. या कारखान्याच्या ऊस नोंद दाखल्यावर अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेकडून ऊस पिक कर्ज उपलब्ध होणार आहे. पंचगंगा उद्योग समुहाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजी कर्डिले यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी चर्चा केली. यावेळी कर्डिले यांनी सेवा संस्था सभासदांना बँकेच्या कर्ज धोरणानुसार प्रत्यक्ष पिक पाहणी करून ऊस पिक कर्ज वितरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे परिपत्रक काढून पत्राद्वारे कळविण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे.

पंचगंगा शुगर कारखाना शेतकऱ्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे. तालुक्यात दोन साखर कारखाने असून देखील अनेकदा शेतकऱ्यांना बाहेरील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. कारखान्याच्या माध्यमातून ती अडचण शेतकऱ्यांची दूर होणार आहे. पीक कर्जाबाबत अडचणी येत असल्याने कारखान्याचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेला पत्र दिले होते. बँकेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज दिल्यास व त्या शेतकऱ्याने आमच्या कारखान्यास ऊस दिल्यास त्याच्या कर्जाची ऊस बिलातून कपात करुन कर्ज खात्यात वर्ग करण्याची हमी देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जासाठी बँकेकडे होणारी पायपीट थांबेल. यावेळी सतीश कर्डिले, प्रताप चिंधे, राजेंद्र मते उपस्थित होते.

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here