अहिल्यानगर : कर्मवीर काळे कारखान्यातर्फे ऊस तोडणी कामगारांची मोफत आरोग्य तपासणी

अहिल्यानगर : कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व प्राथमिक आरोग्य केंद्र, चासनळी यांच्या सहकार्याने कारखान्याचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस तोडणी कामगारांसाठी मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात २०० ऊस तोडणी कामगारांची तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले. कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या वसाहतीमध्ये हे मोफत सर्वरोग निदान आरोग्य तपासणी शिबिर झाले. शिबिरात ऊस तोडणी कामगारांचे रक्तदाब, रक्तातील साखरेचे प्रमाण, हिमोग्लोबीन, गरोदर महिलांची व लहान मुलांची तपासणी करून सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी आदी आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप म्हणाले की, ऊस तोडणी काम हे शारीरिकदृष्ट्या अत्यंत कठीण व तणावपूर्ण असते. त्यामुळे मजुरांची आरोग्याची स्थिती अनेकदा गंभीर स्वरूप धारण करू शकते. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांनी नियमितपणे आरोग्याची तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तर कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांनी सांगितले की, या कामगारांना ऊस तोडीच्या अतिशय कष्टाच्या कामामुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here