अहिल्यानगर : शेवगाव तालुक्यातील गंगामाई इंडस्ट्रीज अँण्ड कंन्स्ट्रक्शन्स प्रा. ली. हरिनगर या साखर कारखान्याचा १४ वा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन तथा मुळे उद्योग समुहाचे संस्थापक पद्माकरराव मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात झाला. या हंगामात गंगामाई कारखाना परिसरातील इतर कारखान्याच्या बरोबरीने ऊस दर देण्यात कुठेही कमी पडणार नसल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक रणजित मुळे यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे तांत्रिक सल्लागार एस. एन. थिटे, ऊस उत्पादक, विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य, सर्व खातेप्रमुख, कामगार, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
कारखान्याचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबर पासून सुरू करण्यासाठी पुर्वतयारी झालेली असल्याचे व्हाईस प्रेसिडेंट व्हि. एस. खेडेकर यांनी सांगितले. या हंगामामध्ये उसाचे लागवड क्षेत्र मागील हंगामापेक्षा कमी झालेली आहे. परंतु पाऊस चांगला झाल्यामुळे हेक्टरी ऊस उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. गाळप हंगाम २०२४-२५ करिता तोडणी वाहतूक यंत्रणा व इतर पूर्व तयारी झालेली आहे. जायकवाडी धरण 100 टक्के भरले आहे. त्याचबरोबर कारखाना कार्यक्षेत्र व संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्यामुळे पुढील गाळप हंगाम २०२५-२६ करिता ऊस लागवड क्षेत्रात वाढ होणार आहे. या हंगामातही कारखान्याचे गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.