अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातर्फे कार्यक्षेत्रातील गावांमध्ये नवीन ऊस लागवडीसाठी प्रती एकरी ५५०० ऊस रोपे (४/२ फुट सरीमध्ये ) प्रती रोप रुपये १.७० पैसे या अनुदानित दराने शेतकऱ्यांचे बांधावर पोहोच केले जाणार आहेत. याशिवाय, शेतकऱ्यांना प्रती एकरी १५० प्लास्टिक ट्रे व २० गोण कोकोपीट टक्के अनुदानावर वसुलीचे अटीवर दिले जाईल. एकरी रूपये १५०० रुपये प्रमाणे अनुदान दिले मिळेल, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव उर्फ बाबा ओहोळ यांनी दिली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवड, खोडवा, निडवा पिक घेणाऱ्या ऊस उत्पादकांसाठी विविध अनुदानित ऊस विकास योजना सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कारखान्याचे व्हाईस चेअरमन संतोष हासे व सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी सांगितले की, जे शेतकरी प्रमाणित बेणे प्लॉटमधील बेणे ऊस लागवडीसाठी विकत घेऊन वापरतील त्यांना बेणे रक्कम म्हणून १०,००० प्रती एकरी वसुलीचे अटीवर दिले जाते. निवळीचे खताचे बियाणाची ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. राजहंस सेंदीय खत व अमृतशक्ती दाणेदार सेंद्रीय खते तसेच बायो फर्टीलाझर वापरणे गरजेचे आहेत. २०२५ – २६ गळीताचे ऊसासाठी ऊस उत्पादकांना ५० टक्के अनुदानावर वसुलीचे अटीवर प्रती एकरी १ मे टन अमृतशक्ती दाणेदार सेंद्रिय खत देण्यात येते. याबाबत ऊस उत्पादकांनी कारखान्याचे विभागीय गट कार्यालय किवा ऊस विकास विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.