अहिल्यानगर : मुळा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी कामगारांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. मुळा कारखाना व सार्वजनिक आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र सोनई यांचे संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या शिबिरामध्ये ऊस तोडणी कामगाराची आरोग्य तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी डॉ. संतोष विधाते यांनी आरोग्याची कशाप्रकारे काळजी घेतली जावी, याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. राजू बर्डे यांनी ऊस तोडणी कामगारांना क्षयरोग या आजाराबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल मॅनेजर शंकरराव दरंदले होते. याप्रसंगी डॉ. संतोष विधाते, विनायक दरंदले, डॉ. सुनील वाघ, डॉ. रमेश जावळे यासह आदी उपस्थित होते. दत्ता पाटील-सोनवणे यांनी आभार मानले.