अहिल्यानगर : सहकारमहर्षी थोरात साखर कारखान्याच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन

अहिल्यानगर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांची आर्थिक शिस्त काटकसर आणि पारदर्शकता, यामुळे कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे. कारखाना स्थापन झाल्यापासून मातीच्या भिंतीत असलेल्या ऑफिसमध्ये कामकाज सुरू होते. अत्यंत काटकसर व पारदर्शकतेतून कारखान्याचे कामकाज ही आपली परंपरा राहिली. त्यामुळे ऊस उत्पादकांना कायम उच्चांकी भाव मिळाला. नवीन कारखाना व को जनरेशन प्लांट मुळे पुढील ५० वर्षाची व्यवस्था झाली असून अद्यावत ऑफिस असावे, अशी सर्वांची भावना होती. त्यानुसार उभारलेली नवी इमारत वैभवशाली परंपरेचा माईल्डस्टोन ठरेल, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या वास्तुशांती व पूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आमदार थोरात यांची निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार बाळासाहेब थोरात व कांचनताई थोरात, बाबासाहेब ओहोळ व सविताताई ओहोळ आणि संतोष हासे व मनीषा हासे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. डॉ. सुधीर तांबे, कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन संतोष हासे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, आर. बी. राहणे, रामहरी कातोरे, सोमेश्वर दिवटे, नवनाथ आरगडे, फुलंब्रीचे बबनराव देशमुख, बीडचे दादासाहेब मुंडे, बी. आर. चकोर, गणपतराव सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, विश्वासराव मुर्तडक आदींसह संगमनेर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here