अहिल्यानगर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ऊस गाळपात जिल्ह्यात अव्वल : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

अहिल्यानगर : साखर उद्योगात आगामी काळामध्ये एकरी ऊस उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी एआयसह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागणार आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याचे काम महाराष्ट्रात आदर्शवत आहे. कारखाना ऊस गळीतामध्ये जिल्ह्यात अव्वल आहे. यंदा ८,२५,९०० मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून वेळेत शेतकऱ्यांचे पेमेंट करण्याबाबतीतही कारखाना पहिल्या क्रमांकावर आहे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कांचन थोरात, दुर्गाताई तांबे, बाजीराव खेमनर, अॅड. माधवराव कानवडे, आर. बी. राहणे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, पांडुरंग घुले, शरयू देशमुख आदी उपस्थित होते. सांगता समारंभात डॉ. तांबे, बाबा ओहोळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अविनाश सोनवणे, नवनाथ आरगडे, सुभाष सांगळे, नवनाथ आंधळे, अर्चना बालोडे, निर्मला गुंजाळ, विजय राहणे, ललिता दिघे, नानासाहेब शिंदे, अजित काकडे, सेक्रेटरी किरण कानवडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here