अहिल्यानगर : कर्मवीर काळे कारखान्यात ७० व्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन

अहिल्यानगर: कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४- २५ च्या ७० व्या गळीत हंगामासाठी संचालक मनोज जगताप यांच्या हस्ते रोलर पूजन करण्यात झाले. कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाची जय्यत तयारी सुरू झाली असल्याचे सांगण्यात आले. आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ संचालक मार्गदर्शक अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोलर पूजन कार्यक्रम झाला. गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मागील वर्षी नवीन युनिटवर गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. आता त्या यंत्र सामुग्रीच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जात आहेत.

आमदार आशुतोष काळे म्हणाले कि, कर्मवीर काळे कारखाना कार्यक्षेत्रात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही. परंतु पुढील काही दिवसात समाधानकारक पाऊस होईल, अशी अपेक्षा आहे. कारखान्यात इतर कामे प्रगतीपथावर आहेत. गळीत हंगामाच्या दृष्टीने ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरती अॅडव्हान्स वाटप सुरु करण्यात आले आहे असे सांगण्यात आले. यावेळी व्हा. चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे, संचालक दिलीपराव बोरनारे, सूर्यभान कोळपे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, शंकरराव चव्हाण, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, श्रावण आसने, गंगाधर औताडे, संचालिका वत्सलाबाई जाधव, इंदुबाई शिंदे, प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, ज्ञानेश्वर आभाळे, बाबा सय्यद, संतोष शिरसाठ, निवृत्ती गांगुर्डे, सुर्यकांत ताकवणे, सोमनाथ बोरनारे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here