अहिल्यानगर : साखरसम्राट उतरणार विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, जोरदार तयारी सुरु

अहिल्यानगर :अहिल्यानगरच्या राजकारणात जिल्हा बँकेच्या माध्यमातून आणि साखर कारखान्यांच्या माध्यमातून कार्यरत असलेले अनेक दिग्गज राजकारणी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्याचे सत्ताकेंद्र जिल्हा बँकेला समजले जाते. तेथून जवळपास नऊ संचालक निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. तर दिग्गज साखरसम्राटही मैदानात असतीलच असे दिसते. सध्या १२ विधानसभा मतदारसंघांत अनेक नावांची चर्चा आहे. याशिवाय साखर कारखाना ताब्यात नसलेली अनेक नावेही निवडणुकीच्या मैदानात दिसणार आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे चेअरमन व भाजप नेते शिवाजी कर्डिले, चंद्रशेखर घुले, मोनिका राजळे, शंकरराव गडाख, राहुल जगताप, अनुराधा नागवडे, काळे, कोल्हे, भांगरे हे जिल्हा बँकेचे नऊ संचालक विधानसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. तर साखर सम्राटही उमेदवार मोठ्या प्रमाणात रिंगणात असतील. यात यात राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, घुले, गडाख, राजळे, अॅड. प्रताप ढाकणे, जगताप, नागवडे यांचा समावेश आहे. राजकारणाचे सत्ताकेंद्र समजल्या जाणाऱ्या जिल्हा बँकेतून पुन्हा विधानसभा गाठण्यासाठी दिग्गज संचालक सज्ज आहेत.

शिवाजी कार्डिले गेल्या निवडणुकीत प्रा. तनपुरे यांच्याकडून ते पराभूत झाले. नंतर ते चंद्रशेखर घुलेंना पराभूत करून ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले. आता ते राहुरीतून पुन्हा तनपुरेंविरोधात लढतील. नेवाशातून आमदार शंकरराव गडाख निवडणूक मैदानात असतील. श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. तर जिल्हा बँक संचालिका अनुराधा राजेंद्र नागवडे या प्रथमच निवडणूक लढवतील. शेगाव-पाथर्डीतून जिल्हा बँक संचालक चंद्रशेखर घुले, विद्यमान आमदार तथा बँकेच्या संचालिका मोनिका राजळे, कोपरगावातून आमदार आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे हे दोन्ही जिल्हा बँकेचे संचालक एकमेकांविरोधात भिडणार आहेत. अकोल्यातून अमित भांगरे मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here