अहिल्यानगर : शॉर्टसर्किटने आग, दीड एकरातील ऊस भस्मसात

अहिल्यानगर : तालुक्यातील गुंडेगाव येथे मंगळवारी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सदाशिव कुताळ यांचा दीड एकर ऊस जळून खाक झाला. यामध्ये कुताळ यांचे मोठे नुकसान झाले आहे. महावितरण व महसूल मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी करून शासकीय मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी कुताळ यांनी केली आहे.

कुताळमळा परिसरातील आपल्या शेतात सदाशिव यांनी दीड एकरात ऊस लागवड केली होती. त्यांनी दुष्काळी परिस्थिती असल्याने एक किलोमीटरवरून पाणी आणून पीक जगवले. आगीत हा सर्व ऊस भस्मसात झाला. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऊस जळाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here