अहिल्यानगर : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना टिकला तरच परिसराचे वैभव टिकून राहील. परिसरासाठी वरदान ठरणारे हे वैभव यापुढच्या काळातही टिकवून ठेवण्यासाठी कारखान्याच्या सर्व सभासदांनी आपला ऊस आपल्या मालकी हक्काच्या कारखान्यालाच घालून कारखान्याला उर्जितावस्थेत आणावे, असे आवाहन केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष माधव काटे यांनी केले. केदारेश्वर कारखान्याचा सन २०२४-२५ चा अग्निप्रदीपन सोहळा व गळीत हंगामाच्या शुभारंभाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात काटे बोलत होते.
काटे यांनी सांगितले की, हा कारखाना उभारताना स्व. ढाकणे यांना अनंत अडचनींना सामोरे जावे लागले. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक वेळा कारखाना बंद ठेवावा लागला. अनेकवेळा भाडेतत्वावर चालवायला द्यावा लागला आहे. स्व. ढाकणे यांच्यानंतर अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी स्वतःच्या मालमत्ता ती गहाण टाकून कारखाना चालू ठेवला. गतवर्षातील गळीत हंगामाचे राहिलेले पेमेंट नुकतेच अदा केले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनकुमार घोळवे, यावेळी उद्धव दुसुंग व हरिभाऊ घोरतळे यांची भाषणे झाली. सहाय्यक अभियंता स्वप्नील दौंड यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले. प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी प्रास्ताविक केले. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक बापुराव घोडके यांनी आभार मानले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.