अहिल्यानगर : प्रचारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांच्या ऊस तोडीसाठी टाळाटाळ करण्याचा प्रकार : आमदार शिवाजीराव कर्डिले

अहिल्यानगर : राहुरी तालुक्यात ऊस तोडीबाबत शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाल्यास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकायनि प्रवरा कारखान्याच्या माध्यमातून न्याय दिला जाईल, असा विश्वास जिल्हा बँकेचे चेअरमन, आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. राहुरी विधानसभा मतदार संघाची निवडणूक पार पडली. यावेळी प्रचारात सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांच्या ऊस तोडीसाठी टाळाटाळ करण्याचा प्रकार काही ठिकाणी सुरू झाल्याची माहिती समजली आहे, असा दावा आमदार कर्डिले यांनी केला.

आमदार कर्डिले म्हणाले की, राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊसतोडीबाबत काळजी करू नये. वेळेपूर्वी ऊस तोडण्याची घाई करू नये. ऊस तोडीबाबत अडचण निर्माण झाल्यास तत्काळ माझ्याशी संपर्क साधावा. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने प्रवरा साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस तोड करण्यासाठी न्याय दिला जाईल. निवडणूक ठराविक काळापूर्ती असते. यामध्ये लोकशाही मार्गान मतदारांसह सभासद कार्यकर्ते भूमिका घेतात. निवडणूक संपल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून काम करणे महत्त्वाचे असते, परंतू काही ठिकाणी केवळ राजकारणाला महत्त्व दिले जाते. यामुळे काही अंशी प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो असे सांगत, शेतकऱ्यांनी काळजी न करता ऊस तोडीबाबत समस्या असल्यास संपर्क साधावा. न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे आमदार कर्डिले यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here